1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त जाणून घ्या वाहतुकीत होणारे बदल

1 मे रोजी राज्यभरात मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. त्यासोबतच, या दिवशी राज्यातील अनेक ठिकाणी भव्य मिरवणूक पाहायला मिळणार आहे आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील होणार आहे.

1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त जाणून घ्या वाहतुकीत होणारे बदल

मुंबई: 1 मे रोजी राज्यभरात मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. त्यासोबतच, या दिवशी राज्यातील अनेक ठिकाणी भव्य मिरवणूक पाहायला मिळणार आहे आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील होणार आहे. मात्र हा दिवस का साजरा केला जातो? हा दिवस साजरा करण्यामागचा मूळ हेतू काय? हे अनेकांना माहित नाही. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

महाराष्ट्र दिन साजरा करण्यामागचे ऐतिहासिक महत्व

जेव्हा भारत स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशाची प्रादेशिक रचना खूप वेगळी होती. स्वातंत्र्यानंतर अनेक छोटी छोटी राज्ये एकत्र करून राज्य व्यवस्थेची स्थापना करण्यात आली. 1956 मध्ये, राज्य पुनर्रचना कायद्याने भाषेच्या आधारावर भारतीय राज्यांच्या सीमा निश्चित केल्या. तथापि, 'बॉम्बे' या बहुभाषिक राज्याच्या सीमा विसंगत होत्या. या राज्यात मराठी आणि गुजराती या दोन भाषा बोलणारे लोक होते. या मतभेदांमुळे 'बॉम्बे' राज्याचे दोन राज्यांत विभाजन करण्याची चळवळ सुरू झाली. परिणामी मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांसाठी गुजरात ही दोन राज्ये मुंबई पुनर्रचना कायदा 1960 अंतर्गत अस्तित्वात आली. हा कायदा 1 मे 1960 रोजी लागू झाला. तेव्हापासून हा दिवस 'महाराष्ट्र दिन' म्हणून साजरा केला जातो.

1 मे साठी मुंबईतील कोणते रस्ते बंद असतील?

महाराष्ट्र दिनानिमित्त दादर येथील शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या परेडपूर्वी मुंबई वाहतूक पोलिसांनी महत्वाची सूचना जारी केली आहे, ज्यामध्ये 1 मे रोजी सकाळी 6:00 ते दुपारी 12:00 वाजेपर्यंत वाहतूक निर्बंध लागू असतील.

1 – केळुस्कर रोड (दक्षिण आणि उत्तर) हा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद राहील. फक्त निमंत्रित केलेल्या मान्यवरांच्या वाहनांनाच या मार्गावर जाण्याची परवानगी असेल.

2 – सिद्धिविनायक जंक्शन ते एसके बोले रोड (SK Bole Road) ओलांडून पोर्तुगीज चर्च जंक्शनपर्यंत वाहने एकेरी मार्गाने जाऊ शकतील.

3 – सिद्धिविनायक जंक्शन ते येस बँक जंक्शन पर्यंत प्रवेश स्वातंत्र्यवीर सावरकर रोडवर प्रतिबंधित असेल.

4 – पश्चिम उपनगरांकडे जाणारी वाहतूक सिद्धिविनायक जंक्शनवरून पुन्हा वळवली जाईल. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना एसके बोले रोड, पोर्तुगीज चर्च, गोखले रोड, एलजे रोड आणि राजा बडे चौक मार्गाने जाण्यास सांगितले जाईल.

5 – दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना पांडुरंग नाईक रोड, राजा बडे चौक, एलजे रोड आणि गोखले रोड मार्गाने जावे लागेल.

हेही वाचा: काॅंग्रेसचा का हाथ पाकिस्तान के साथ; काॅंग्रेसच्या पोस्टला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर

'हे' असतील नो पार्किंग झोन

1 – केळुस्कर रोड (दक्षिण आणि उत्तर),

2 – पांडुरंग नाईक रोड,

3 – एनसी केळकर रोड (गडकरी चौक ते कोतवाल गार्डन),

जर कार पास नसेल तर नागरिकांनी प्लाझा सिनेमा, जेके सावंत रोड, दादर (पश्चिम) जवळील कोहिनूर पार्किंग लॉटमध्ये त्यांची वाहने पार्क करण्याचे आवाहन या सूचनेत करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number