आयपीएल 2026 च्या हंगामात सलग पराभव स्विकारणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने सातव्या सामन्यानंतर अखेर विजयाचे खाते उघडले आहे. आज कोलकाताच्या ईडन गार्डन्स या स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हे आमने-समाने आले. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि केकेआरसमोर 156 धावांचं आव्हान ठेवलं होतं. केकेआरने 19.4 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 161 धावा केल्या आणि केकेआरने पहिलावहिला विजय मिळवला आहे. यावेळी केकेआरच्या विजयासाठी रिंकू सिंग आणि अनुकूल रॉय या जोडीने केकेआरला विजय मिळवून दिला. रिंकूने शेवटच्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर सिक्स ठोकला आणि अशक्य वाटणारा विजय खेचून आणला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 37 बॉलमध्ये नॉट आऊट 76 रन्सची विजयी भागीदारी केली.
राजस्थान रॉयल्सने दिलेल्या आव्हानाचे पाठलाग करताना केकेआरची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर म्हणून मैदानात आलेले टीम सायफर्ट आणि कर्णधार अजिंक्य रहाणे हे दोघे ही रिकाम्या हाती परले. तर अंगक्रिश रघुवंशी 10, कॅमेरून ग्रीन 27 आणि रॉवमन पॉवेल 23 अशी खेळी पाहायला मिळाली. यावेळी केकेआरच्या गोलंदाजांनी देखील प्रत्येकी 3-3 विकेट्स घेत कमालीची कामगिरी बजावली. यावेळी केकेआरकडून रिंकू सिंग आणि अनुकूल रॉय यांनी संयमी खेळी खेळत खिंड लढवली. दोघांनी सातव्या विकेटसाठी नाबाद 76 धावांची अभूतपूर्व भागीदारी रचली. ज्यामुळे केकेआरने 19.4 षटकांत 6 गडी गमावून 161 धावा केल्या आणि हंगामातील आपल्या पहिल्या विजय मिळवला.
हेही वाचा- IPL 2026 : CSK ला मोठा धक्का! आयुष म्हात्रे इतके दिवस मैदानाबाहेर; चेन्नईच्या अडचणीत भर
तर राजस्थानकडून वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या दोघांनी 81 धावांची भागीदारी करत राजस्थान रॉयल्ससाठी डावाची सुरुवात केली. वैभवने 28 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांसह 46 धावा केल्या. तसेच यशस्वी जैस्वालने 29 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांसह 39 धावा केल्या. त्यानंतर ध्रुव जुरेलने 5, रियार परागने 12, शिमरॉन हेटमर्नने 15 आणि रवींद्र जडेजाने 9 धावांचे योगदान दिले. तसेच राजस्थानच्या गोलंदाजांकडून कार्तिक त्यागी आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या, तर सुनील नारायण याने 2 विकेट्स मिळवल्या.