किशोरी पेडणेकरांचं इकबालसिंह चहल यांना पत्र

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांने आयुक्त इकबालसिंह चहल यांना पत्र लिहीले आहे. महापालिका नगरसेवकांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांमध्ये प्रशासन फेरफार करत असल्यावरुन माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई महापालिकेची मुदत संपण्याआधी घेतलेल्या निर्णयात प्रशासनाचा हस्तक्षेप केलाचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. या प्रकरणी मुंबई महापालिकेतील प्रशासकांनी ७ मार्च पर्यंत मंजूर झालेल्या प्रस्तावापैकी […]

किशोरी पेडणेकरांचं इकबालसिंह चहल यांना पत्र

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांने आयुक्त इकबालसिंह चहल यांना पत्र लिहीले आहे. महापालिका नगरसेवकांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांमध्ये प्रशासन फेरफार करत असल्यावरुन माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई महापालिकेची मुदत संपण्याआधी घेतलेल्या निर्णयात प्रशासनाचा हस्तक्षेप केलाचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. या प्रकरणी मुंबई महापालिकेतील प्रशासकांनी ७ मार्च पर्यंत मंजूर झालेल्या प्रस्तावापैकी एक ते दोन निर्णय बदलण्यात आल्याची माहिती आहे. ७ मार्चपर्यंत मान्य करण्यात आलेले निर्णय बदलू नयेत. प्रशासकांनी झालेले निर्णय बदलून नवीन निर्णय घेत असाल तर तो सभागृहाचा अवमान आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

काय म्हणाल्या पत्रात ?

महानगरपालिकेच्या कार्यकाळात महानगरपालिका तसेच स्थायी समितीसह विविध समित्यांनी घेतलेल्या निर्णयामध्ये फेरफार करण्याबाबतचे प्रस्ताव संबंधित खात्यांकडून प्रशासकाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येत आहेत असे समजते. तरी, मी याद्वारे विनंति करते की, महानगरपालिका तसेच स्थायी समितीसह विविध समित्यांनी महानगरपालिकेच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांमध्ये कोणताही फेरफार अथवा सदर प्रस्ताव रद्द करण्याबाबतचे निर्णय महानगरपालिका अस्तित्वात येईपर्यंत प्रशासक, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी घेणे उचित ठरणार नाही.

मुंबई महापालिकेचा ५ वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलं होती. किशोरी पेडणेकर आणि इकबालसिंह चहल यांच्यात यापूर्वी देखील संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आता विरोधी पक्षाच्या दबावानंतर स्थायी समितीनं घेतलेले ठराव बदलण्यात येत असल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number