किसान सभेचा लाँगमार्च मुंबईच्या दिशेने

शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा नाशिकहून मुंबईत लाल वादळ धडकणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि इतर समविचारी संघटनांनी एकत्र येत हा लाँगमार्च काढलाय. शेतमालाला योग्य भाव मिळावा, अवकाळीने झालेल्या नुकसानाची तातडीने भरपाई मिळावी त्याचसोबत, वनजमिनींचा हक्क मिळावा यांसह इतरही मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी एल्गार पुकारलाय. नाशिकमध्ये एकत्र जमून हा मोर्चा मार्गस्थ झालाय, […]

किसान सभेचा लाँगमार्च मुंबईच्या दिशेने

शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा नाशिकहून मुंबईत लाल वादळ धडकणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि इतर समविचारी संघटनांनी एकत्र येत हा लाँगमार्च काढलाय. शेतमालाला योग्य भाव मिळावा, अवकाळीने झालेल्या नुकसानाची तातडीने भरपाई मिळावी त्याचसोबत, वनजमिनींचा हक्क मिळावा यांसह इतरही मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी एल्गार पुकारलाय. नाशिकमध्ये एकत्र जमून हा मोर्चा मार्गस्थ झालाय, आता मजल-दरमजल करत आणि पायी चालत हा लाँगमार्च मुंबईत येऊन धडकणारेय. नाशिकच्या दिंडोरी मधून निघालेला लॉन्ग मार्च पंचवटी परिसरात दाखल झाला आहे. पंचवटीतील निमानी परिसरात भाजीपाला आणि कांदा रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांनी निषेध केला आहे. शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या मागणीवर मंगळवारी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक होणार आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांशी बोलणं करून देत बैठकीचे आमंत्रण दिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number