राऊतांच्या ईडी कारवाईबाबत सोमय्यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

ईडीन शिवसेना खासदार संजय राऊत यांची अलिबाग आणि दादरमधील मालमत्ता जप्त केली आहे. संजय राऊतांवर झालेल्या ईडी कारवाईमुळे राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, १ हजार ४८ कोटींचा पत्राचाळ घोटाळ्याबाबत ही कारवाई करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. किरीट सोमय्या म्हणाले, संजय राऊतांना वाटते की पोलिसांचा माफियासारखा वापर  करून तोंड […]

राऊतांच्या ईडी कारवाईबाबत सोमय्यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

ईडीन शिवसेना खासदार संजय राऊत यांची अलिबाग आणि दादरमधील मालमत्ता जप्त केली आहे. संजय राऊतांवर झालेल्या ईडी कारवाईमुळे राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, १ हजार ४८ कोटींचा पत्राचाळ घोटाळ्याबाबत ही कारवाई करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, संजय राऊतांना वाटते की पोलिसांचा माफियासारखा वापर  करून तोंड बंद करू परंतु कितीही दबाव टाका असे म्हणत आम्हाला फरक पडत नाही. पत्राचाळ घोटाळ्यातील अलिबाग आणि दादरमधील मालमत्ता ईडीन जप्त केली आहे, असे म्हणत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे, अशीही मागणीही सोमय्या यांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरेंना असे वाटते की, ते माफिया सरकार असल्याची टीकादेखली सोमय्यांनी केली आहे.

ईडीकडून राऊतांची संपत्ती जप्त

सक्तवसुली संचालनालयाकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून संजय राऊत यांचे अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरमधील राहतं घर जप्त करण्यात आले आहे. पत्रा चाळप्रकरणी ईडीने कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊतांच्या संपत्तीवर ईडीची टाच पडली असून ईडीने संजय राऊतांच्या अलिबाग आणि मुंबईतील दादरमधील संपत्ती जप्त केली आहे. ईडीने राऊतांच्या आठ जागा जप्त केल्या आहे. ईडीने राऊतांवर केलेल्या कारवाईमुळे राऊत समर्थक आक्रमक झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number