किरीट सोमय्यांची मंत्रालयातील ‘त्या’ फोटोवरून पोलिसांत तक्रार

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मंत्रालयातील नगरविकास खात्यात फाईल चाळतानाचा फोटो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या फोटोमध्ये किरीट सोमय्या खुर्चीत बसून हसताना दिसत आहेत. त्यानंतर किरीय सोमय्या यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी त्या फोटोवरून पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. मंत्रालयातील कागदपत्रे तपासण्याचा फोटो व्हायरल करून गोपनीयतेचा भंग […]

किरीट सोमय्यांची मंत्रालयातील ‘त्या’ फोटोवरून पोलिसांत तक्रार

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मंत्रालयातील नगरविकास खात्यात फाईल चाळतानाचा फोटो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या फोटोमध्ये किरीट सोमय्या खुर्चीत बसून हसताना दिसत आहेत. त्यानंतर किरीय सोमय्या यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी त्या फोटोवरून पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत.

मंत्रालयातील कागदपत्रे तपासण्याचा फोटो व्हायरल करून गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी किरिट सोमय्या यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मंत्रालयातील नगर विकास विभागात कागदपत्रे तपासत असताना त्यांचे फोटे काढण्यात आले. असे फोटो काढणे हा गोपनीयतेचा भंग असून किरीट सोमय्या यांना झेड प्लस सुरक्षेबाबतही हेळसांड आहे. त्यामुळे हे फोटो काढणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात त्यांनी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात  तक्रार देणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी ट्विट करत दिली आहे.

‘मंत्रालय हे संरक्षित ठिकाण आहे. त्यामुळे मंत्रालयातील सुरक्षा विभाग आणि नगरविकास विभागाने फोटो काढण्यासाठी त्या व्यक्तीला का आणि कशी परवानगी दिली?’, असा सवाल किरिट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number