किरीट सोमैयांचं मंत्रालयात आंदोलन

भाजपा नेते किरीट सोमैया यांनी मंत्रालयातील महसूल विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. सोमैयांनी माहितीच्या अधिकारात कोर्लईतील कथित १९ बंगल्याप्रकरणी माहिती मागितली होती. मात्र, बंगल्याप्रकरणी माहिती न मिळाल्याने सोमैयांनी मंत्रालयातील महसूल विभागाकडे आंदोलन केले आहे. किरीट सोमैयांनी उद्धव यांच्या कोर्लईतील १९ बंगल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, रेवदंडा पोलिसांनी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक करण्यात करण्यात […]

किरीट सोमैयांचं मंत्रालयात आंदोलन

भाजपा नेते किरीट सोमैया यांनी मंत्रालयातील महसूल विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. सोमैयांनी माहितीच्या अधिकारात कोर्लईतील कथित १९ बंगल्याप्रकरणी माहिती मागितली होती. मात्र, बंगल्याप्रकरणी माहिती न मिळाल्याने सोमैयांनी मंत्रालयातील महसूल विभागाकडे आंदोलन केले आहे.

किरीट सोमैयांनी उद्धव यांच्या कोर्लईतील १९ बंगल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, रेवदंडा पोलिसांनी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक करण्यात करण्यात आली. तसेच, कोर्लईतील १९ बंगल्याप्रकरणी कोकण महसूल आयुक्तांच्या नेतृत्त्वात एक समिती नेमली होती. या प्रकरणाचा अहवाल किरीट सोमैयांनी मागितला होता. मात्र, योग्य माहिती न मिळाल्यामुळे किरीट सोमैयांनी मंत्रालयातील महसूल विभागाकडे आंदोलन सुरू केले आहे.

काय आहे प्रकरण?

अन्वय नाईक यांनी २००९ मध्ये ग्रामपंचायतीच्या परवानगीने १९ बंगले बांधले होते. दरवर्षी त्यांनी ग्रामपंचायतीला नियमीतपणे घरपट्टी भरणा केली. त्यानंतर २०१४मध्ये ठाकरे आणि वायकर परिवाराने अन्वय नाईक यांच्याकडून सदर जमी बंगल्यासह स्वत:च्या नावे विकत घेतले.

उद्धव ठाकरे यांनी या १९ बंगल्यांसाठी २०१३ ते २०२१ या आठ वर्षांची घरपट्टी भरली. ११ नोव्हेंबर २०२० रोजी घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर ठाकरे सरकार, मुख्यमंत्री कार्यालयाने अलिबाग, रायगडमधील शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणून १९ बंगल्यांच्या नोंदी शासकीय दस्तऐवजांमधून काढून टाकल्या. त्यामुळे ठाकरे यांच्या या व्यवहाराची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number