वृत्तसंस्था, नवी दिल्ली
आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोरील अडचणी संपण्याची काही चिन्ह दिसत नाही आहेत.
यावेळी केजरीवाल अडचणीत सापडले आहेत ते त्यांच्याच माजी मंत्र्यामुळे. मंत्रीमंडळातून बडतर्फ केल्यानंतर कपिल मिश्रा यांनी केजरीवाल यांच्यावर घोटाळ्याचे खळबळजनक आरोप केले
आहेत.
केजरीवालांच्या मंत्रीमंडळातील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी मुख्यमंत्र्यांना दोन कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट मिश्रा यांनी केला आहे. जैन यांनी केलेला 50 कोटींचा गैरव्यवहार उघडकीस
येऊ नये यासाठी ही रक्कम देण्यात आली असून, हे पैसे देताना मी स्वतः पाहिलं असा आरोप कपिल मिश्रा यांनी केला.
हे पैसे कुठून आणि कशासाठी देण्यात आले याच्या चौकशीची मागणीसुद्धा त्यांनी केली आहे.