Kia Syros की Mahindra XUV 3XO? फीचर्सपासून मायलेजपर्यंत जाणून घ्या, ‘बेस्ट’ कॉम्पॅक्ट SUV कोणती!

0 लाखांच्या बजेटमध्ये नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी Kia Syros आणि Mahindra XUV 3XO या दोन कारमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे.

Kia Syros की Mahindra XUV 3XO? फीचर्सपासून मायलेजपर्यंत जाणून घ्या, ‘बेस्ट’ कॉम्पॅक्ट SUV कोणती!

Compact SUV in Indian Market : भारतीय बाजारपेठेत सध्या कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटला मोठी मागणी आहे. विशेषतः 10 लाखांच्या बजेटमध्ये नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी Kia Syros आणि Mahindra XUV 3XO या दोन कारमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. या दोन्ही गाड्या पेट्रोल आणि डिझेल पर्यायांसह येतात, पण तुमच्या गरजेनुसार कोणती कार योग्य ठरेल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

किंमत आणि बजेट
जर तुमचे बजेट मर्यादित असेल, तर Mahindra XUV 3XO तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते, कारण याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 7.28 लाख आहे. याउलट, Kia Syros ही थोडी प्रीमियम कॅटेगरीत मोडते आणि तिची सुरुवातीची किंमत सुमारे 8.67 लाख आहे. कमी किमतीत एसयूव्हीचा अनुभव घेणाऱ्यांसाठी महिंद्रा एक स्वस्त पर्याय देते.

इंजिन क्षमता आणि परफॉर्मन्स
परफॉर्मन्सच्या बाबतीत Mahindra XUV 3XO आघाडीवर असल्याचे दिसते. याचे पेट्रोल इंजिन 111 bhp ते 131 bhp पर्यंत पॉवर देते, तर 1.5-लिटर डिझेल इंजिन 300 Nm चा जबरदस्त टॉर्क जनरेट करते, जे हायवेवर गाडी चालवताना खूप उपयुक्त ठरते. दुसरीकडे, Kia Syros मध्ये 1.0-लिटर टर्बो पेट्रोल (118 bhp) आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन (114 bhp) मिळते.

हेही वाचा – You Tube AI Trap : सावधान! युट्यूबवर दर 5 पैकी 1 व्हिडीओ बनावट; AI चा वापर करून बनवलेल्या कोट्यवधी व्हिडिओजचा सुळसुळाट

मायलेजमधील फरक
दैनंदिन प्रवासासाठी Mahindra XUV 3XO अधिक किफायती आहे. ती पेट्रोलमध्ये साधारण 20.1 kmpl आणि डिझेलमध्ये 21.2 kmpl पर्यंत मायलेज देते. Kia Syros चे मायलेज पेट्रोलसाठी 18.2 kmpl आणि डिझेलसाठी 20.75 kmpl आहे. जर इंधनाची बचत ही तुमची प्राथमिकता असेल, तर महिंद्राचे पारडे जड आहे.

स्पेस आणि बूट कॅपेसिटी
कुटुंबासोबत प्रवासासाठी आणि जास्त सामानासाठी Kia Syros उत्तम आहे, कारण यात 465 लिटरचा मोठा बूट स्पेस दिला आहे. तसेच यात 'स्लाइडिंग रिअर सीट्स'चे वैशिष्ट्य मिळते. XUV 3XO मध्ये बूट स्पेस केवळ 364 लिटर आहे, पण त्याचा लांब व्हीलबेस प्रवाशांना अधिक लेग-रूम (पायांसाठी जागा) मिळवून देतो.

आधुनिक फीचर्स आणि सुरक्षा
दोन्ही गाड्यांमध्ये अत्याधुनिक फीचर्सची रेलचेल आहे:
Kia Syros: ड्युअल स्क्रीन सेटअप, वेंटिलेटेड सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ आणि लेव्हल-2 ADAS.
Mahindra XUV 3XO: दोन 10.25-इंच स्क्रीन, 360-डिग्री कॅमेरा आणि टॉप व्हेरियंटमध्ये लेव्हल-2 ADAS. सुरक्षा: दोन्ही गाड्यांना Bharat NCAP कडून 5-स्टार रेटिंग मिळाले असून 6 एअरबॅग्स स्टँडर्ड म्हणून दिल्या आहेत.

हेही वाचा – Google Lecture Mode: तुमच्या वैयक्तिक नोट्स आता 'ऑडिओ लेक्चर'मध्ये ऐका; गुगलचे नवे फिचर 'लेक्चर मोड' आहे तरी काय?

थोडक्यात सांगायचे तर..
जर तुम्हाला प्रीमियम फीचर्स, मऊ ड्रायव्हिंग अनुभव आणि जास्त बूट स्पेस हवा असेल, तर Kia Syros निवडा. पण जर तुम्हाला कमी किंमत, अधिक पॉवर आणि चांगले मायलेज हवे असेल, तर Mahindra XUV 3XO ही तुमच्यासाठी एक 'दमदार' डील ठरेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number