राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

ठाणे, २९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे पैलवान खाशाबा जाधव यांनी १९५२ मध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते. त्यांनी कांस्य पदक जिंकले होते. खाशाबांच्या या कामगिरीमुळे जगात भारताची मान उंचावली आणि महाराष्ट्राचा गौरव वाढला होता. या कामगिरीची दखल घेत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन ‘राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला […]

राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

ठाणे, २९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे पैलवान खाशाबा जाधव यांनी १९५२ मध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते. त्यांनी कांस्य पदक जिंकले होते. खाशाबांच्या या कामगिरीमुळे जगात भारताची मान उंचावली आणि महाराष्ट्राचा गौरव वाढला होता. या कामगिरीची दखल घेत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन ‘राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळ्याला हजर होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की,” जसा ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातोय. तसाच महाराष्ट्राच्या मातीतला सुपुत्र ऑलिम्पिकवीर दिवंगत खाशाबा जाधव, ज्यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र्य भारतासाठी पहिलं पदक जिंकलं. त्यांचा जन्मदिन १५ जानेवारी हा महाराष्ट्र राज्याचा राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित करतो.”

याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खाशाबांचा जन्मदिन हा ‘राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number