Kharghar Lift Tragedy: श्वास कोंडला, जीव घाबरला, मृत्यू साक्षात समोर उभा ठाकला! खारघरमध्ये चालू लिफ्ट मध्येच बंद पडली; चार तरूण अडकले अन्…

आतमध्ये चार जण अडकले. परिस्थिती प्रचंड गंभीर होती. आधीच उकाड्याने जीव जातोय आणि त्यात लिफ्ट बंद पडल्याने प्रचंड हाल झाले.

Kharghar Lift Tragedy: श्वास कोंडला, जीव घाबरला, मृत्यू साक्षात समोर उभा ठाकला! खारघरमध्ये चालू लिफ्ट मध्येच बंद पडली; चार तरूण अडकले अन्…

नवी मुंबईतील खारघरमध्ये अक्षरश: घाम फुटणारी घटना घडली आहे. एक दोन नाही तर तब्बल 90 मिनिटे मृत्यू समोर उभा होता. इमारतीमधील  लिफ्ट अचानक बंद पडली आणि आतमध्ये चार जण अडकले. परिस्थिती प्रचंड गंभीर होती. आधीच उकाड्याने जीव जातोय आणि त्यात लिफ्ट बंद पडल्याने प्रचंड हाल झाले.

अंधार, गुदमरलेला श्वास आणि समोर काळ उभा असताना, अग्निशमन दलाच्या जवानांनी देवदूत बनून त्यांची सुखरूप सुटका केली. खारघर सेक्टर 34 बी मधील तुलिप को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये गुरुवारी ही थरारक घटना घडली. लिफ्ट थांबल्यामुळे सुरूवातीला सर्वचजण घाबरले.  लिफ्टमध्ये हवा खेळती नसल्याने काही वेळातच श्वास कोंडू लागला. हा वेळ त्या तरुणांसाठी एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हता. मात्र, जिद्द न सोडता त्यांनी आरडाओरडा करून मदतीची विनंती केली, त्यानंतर सोसायटीमधील नागरिकांनी तातडीने सिडको अग्निशमन केंद्राला पाचारण केले. अथक परिश्रमानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number