भाषणादरम्यान गुलाबराव पाटलांनी बेछूट आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे खडसेंकडून अब्रू नुकसानीचा दावा करण्यात आला आहे. गुलाबराव पाटलांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवण्यासंदर्भात खडसेंनी गुलाबराव पाटलांना नोटीस देखील बजावली आहे.
गुलाबराव पाटलांनी कुठलाही आरोप सिद्ध करून न दाखवल्याने खडसेंकडून सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. अब्रू नुकसानीच्या दाव्याबाबत जळगाव सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटलांवर ५ कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आला असून भाषणादरम्यान गुलाबराव पाटलांनी भ्रष्टाचाराचे आरोप आपल्यावर केल्या प्रकरणी हा अब्रूचा दावा दाखल करण्यात आल्याची माहिती एकनाथ खडसेंनी दिली आहे. याबाबत गुलाबराव पाटलांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे यासंदर्भात नोटीस देखील पाठवण्यात आली होती. मात्र गुलाबराव पाटलांनी कोणतेही आरोप सिद्ध न करून दाखवल्याने जळगाव सत्र न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.