मेळघाटातील खडीमल गावात भीषण पाणीटंचाई

उष्णता वाढल्याने पाण्याची भीषण टंचाई अनेक भागात जाणवते आहे. त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील खडीमल या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. दोन विहिरींचे पाणी आटल्याने या ठिकाणी टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. खडीमलमध्ये 4 टँकरद्वारे पुरवठा सुरू करण्यात आला. हे पाणी थेट विहिरीत सोडले जात आहे. त्यामुळे महिलांना पण्यासाठी पाणवट्याचा आधार घ्याला […]

मेळघाटातील खडीमल गावात भीषण पाणीटंचाई

उष्णता वाढल्याने पाण्याची भीषण टंचाई अनेक भागात जाणवते आहे. त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील खडीमल या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. दोन विहिरींचे पाणी आटल्याने या ठिकाणी टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. खडीमलमध्ये 4 टँकरद्वारे पुरवठा सुरू करण्यात आला. हे पाणी थेट विहिरीत सोडले जात आहे. त्यामुळे महिलांना पण्यासाठी पाणवट्याचा आधार घ्याला लागत आहे. तेथेही तांब्याने पाणी भरावे लागत आहे.

स्वातंत्र्याची 75 वर्षे उलटली तरी शासनाची पाणीपुरवठा योजना पोहचली नाही. त्यामुळे खडीमल सारख्या अनेक गावात हीच परिस्थिती असल्याने कोट्यावधी रुपयांचा पाणीपुरवठा आराखडा आखूनही लोकांना घोटभर पाणी मिळत नाही हे दुर्दैव्यच आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number