मुंबई, १७ जून २०२३, प्रतिनिधी : केजीएफ फेम अभिनेता यश याच्या स्टाईलचे लाखो चाहते आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात त्याचे अनेक चाहते आहेत.यशच्या गाडयांच्या कलेक्शनकडे देखील चाहते आरक्षित होत असतात. अशातच आता यशने नवी गाडी खरेदी केली आहे. यामुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
अभिनेता यश याने नुकतीच काळ्या रंगाची रेंज रोव्हर एसयूव्ही खरेदी केली आहे.या गाडीची किंमत सुमारे 5 कोटी आहे. यशने संपूर्ण कुटुंबासह त्याच्या नव्या गाडीचे स्वागत केले. यावेळचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत यश गाडी चालवताना दिसत आहे, तर त्याच्यासोबत त्याची पत्नी राधिका पंडितही गाडीत बसलेली दिसत आहे. यानंतर यशसोबत त्याची पत्नी, राधिका आणि मुले आयरा आणि यथार्थ यांनीही गाडीसमोर पोज दिली.
केजीएफ फेम यशला गाड्यांचे वेगळेच वेड आहे. त्याच्याकडे दोन मर्सिडीज आहेत. पहिली मर्सिडीज ही 5-सीटर GLC 250D कूप आहे ज्याची किंमत सुमारे 78 लाख रुपये आहे. आणि दुसरी मर्सिडीज कार 7-सीटर Benz GLS 350D लक्झरी SUV आहे, ज्याची किंमत सुमारे 85 लाख रुपये आहे. याशिवाय त्याच्याकडे Audi Q7, BMW 520T, Range Rover Evoque आणि Pajero Sport सारख्या महागड्या गाड्या देखील आहे