केतकी चितळेला जामीन मंजूर

ठाणे न्यायालयातून केतकी चितळेला अखेर दिलासा मिळाला. न्यायाधीश भागवत यांच्या न्यायालयातून केतकी चितळे ला अट्रोसिटी प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. २५ हजार रुपये जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याच प्रकरणाने केतकी चितळेच्या अडचणीत मोठी वाढ केली होती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ […]

केतकी चितळेला जामीन मंजूर

ठाणे न्यायालयातून केतकी चितळेला अखेर दिलासा मिळाला. न्यायाधीश भागवत यांच्या न्यायालयातून केतकी चितळे ला अट्रोसिटी प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. २५ हजार रुपये जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याच प्रकरणाने केतकी चितळेच्या अडचणीत मोठी वाढ केली होती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे.

केतकी चितळेला ठाणे सत्र न्यायालयाने १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.अट्रोसिटी प्रकरणात केतकीला अखेर दिलासा मिळाला आहे. ठाणे न्यायालयातून केतकी चितळेला जमीन मंजूर झाला आहे. यापूर्वी ठाणे सत्र न्यायालयात केतकीच्या वकिलांनी तिला जामीन मिळावा यासाठी युक्तीवाद केला होता. या प्रकरणी युक्तीवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयानं पुढील सुनावणीसाठी १६ जून ही तारीख दिली होती. दरम्यान, न्यायालयानं १६ जूनला २५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number