केतकी चितळेला जामीन मंजूर

मराठी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे ठाणे पोलिसांनी केतकीला अटक केली होती. दरम्यान, ठाणे न्यायालयाने केतकीला जामीन मंजूर केला आहे. केतकी चितळे हिने फेसबुकच्या माध्यमातून शरद पवार यांचा अपमान करणारी पोस्ट केली आहे. त्यामुळे केतकी चितळेला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. तसेच […]

केतकी चितळेला जामीन मंजूर

मराठी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे ठाणे पोलिसांनी केतकीला अटक केली होती. दरम्यान, ठाणे न्यायालयाने केतकीला जामीन मंजूर केला आहे.

केतकी चितळे हिने फेसबुकच्या माध्यमातून शरद पवार यांचा अपमान करणारी पोस्ट केली आहे. त्यामुळे केतकी चितळेला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केतकीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.

ऍड. नितीन भावे यांनी लिहिलेली कविता केतकी चितळेने फेसबुकच्या अधिकृत अकाऊंटवर पोस्ट केली. शरद पवारांनी सादर केलेल्या ‘पाथरवट’ या कवितेचा संदर्भ घेत केतकीने पवारांच्या विरोधात कवितेच्या ओळी पोस्ट केल्या होत्या. त्यामुळे केतकीला प्रसार माध्यमांवर चांगलच ट्रोल करण्यात आलं.

शरद पवारांविरोधीत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी १४ मे रोजी पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतलं होतं. तर १८ मे रोजी केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ठाणे सत्र न्यायालयाने यापूर्वी केतकीला जामीन देण्यास नकार दिला होता. त्यामुळे केतकीचा कोठडीत मुक्काम वाढला होता. दरम्यान, आता केतकी चितळेला जामीन मंजूर झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number