केरला स्टोरीची बक्कळ कमाई

मुंबई, ९मे २०२३, प्रतिनिधी : बॉयकॉटचा ट्रेंड सुरु असताना सध्या सिनेविश्वात बऱ्याच चित्रपटांमुळे वाद निर्माण झाले आहेत. यातील एक म्हणजे अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘केरला स्टोरी’ हा चित्रपट. लव्ह जिहादवर आधारित हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा करताच चहू बाजूंनी या चित्रपटावर टिका होऊ लागली. परंतु टीकांचा भडीमार होत असतानाच या चित्रपटाला प्रेक्षकांचे समर्थन देखील […]

केरला स्टोरीची बक्कळ कमाई

मुंबई, ९मे २०२३, प्रतिनिधी : बॉयकॉटचा ट्रेंड सुरु असताना सध्या सिनेविश्वात बऱ्याच चित्रपटांमुळे वाद निर्माण झाले आहेत. यातील एक म्हणजे अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘केरला स्टोरी’ हा चित्रपट. लव्ह जिहादवर आधारित हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा करताच चहू बाजूंनी या चित्रपटावर टिका होऊ लागली. परंतु टीकांचा भडीमार होत असतानाच या चित्रपटाला प्रेक्षकांचे समर्थन देखील लाभले आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली.

सुदिप्तो सेन दिग्दर्शित केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चर्चेत आला. चित्रपटाचा भयानक ट्रेलर पाहून राजकारणातून देखील यावर जोरदार टीका झाली. अशातच ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात चांगली कमाई केली. दरम्यान काही राज्यांमध्ये अजूनही या चित्रपटाला विरोध केला जात आहे. तमिळनाडूमध्ये चित्रपटाच्या प्रीमिअरवर बंदी घालण्याची चर्चा सुरु असतानाच पश्चिम बंगालमध्ये चित्रपटावर थेट बंदी घालण्यात आली. तर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी देखील टीका केली आहे. दुसरीकडे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.असं सगळं असतानाही चित्रपटाने पहिल्याच दिवशी जोरदार कमाई केली. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार,पहिल्याच दिवशी केरला स्टोरी या चित्रपटाने ७ कोटी ५० लाखांची कमाई केली तर पहिल्या आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाने एकूण ३३.३५ कोटी रुपयांचा गल्ला कमावला. त्यानंतर चित्रपटाने पुन्हा झेप घेत आतापर्यंत या चित्रपटाने ४३ कोटींहून अधिक कमाई केली आहे. एकूणच ही परिस्थिती पाहता विरोध आणि टीकांवर मात करत हा चित्रपट किती दिवस टिक धरणार याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number