वृत्तसंस्था, उत्तराखंड उत्तराखंडमधील महाप्रलयाच्या 3 वर्षांनंतर पहिल्यांदाच केदारनाथमध्ये जंगी सोहळा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारनाथचं दर्शन घेतलं. केदारनाथचं प्रवेशद्वार आजपासून सर्वसामान्य भाविकांसाठी खुलं झालं. यानंतर शिवभक्तांनी केदारनाथच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली आहे. 3 वर्षांनंतर शिवभक्तांना केदारनाथचा हा उत्साह अनुभवायला मिळतो. महाप्रलयाचं महातांडव अंगावर झेलणारं केदारनाथ एखाद्या नववधूसारखं सजलं आहे.