केसीआर यांचा आज सोलापुरात मुक्काम

तेलंगणात सत्ता आल्यानंतर आता महाराष्ट्रात आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न चंद्रशेखर राव यांनी सुरू केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रावर संपूर्ण लक्ष केंद्रीत केलं आहे. राज्यातील काही नेते चंद्रशेखर राव यांच्या गळालाही लागेल आहेत. मात्र, त्यांना अजूनही राज्यातील म्हणावा तसा मोठा नेता मिळालेला नाही. या संपूर्ण पार्श्वभूमीवर चंद्रशेखर राव आज दोन […]

केसीआर यांचा आज सोलापुरात मुक्काम

तेलंगणात सत्ता आल्यानंतर आता महाराष्ट्रात आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न चंद्रशेखर राव यांनी सुरू केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रावर संपूर्ण लक्ष केंद्रीत केलं आहे. राज्यातील काही नेते चंद्रशेखर राव यांच्या गळालाही लागेल आहेत. मात्र, त्यांना अजूनही राज्यातील म्हणावा तसा मोठा नेता मिळालेला नाही. या संपूर्ण पार्श्वभूमीवर चंद्रशेखर राव आज दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे. त्यांचं अख्ख मंत्रिमंडळच महाराष्ट्रात येणार आहे. चंद्रशेखर राव राज्यात मोठं शक्तीप्रदर्शन करणार असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

चंद्रशेखर राव थोड्याच वेळात तेलंगणातून महाराष्ट्राकडे यायला निघणार आहेत. ते सोमवार आणि मंगळवारी (दि. २६ आणि २७ जून) महाराष्ट्रात राहणार आहेत. तेलंगणातून ते थेट उमरग्याला येणार आहेत. त्यानंतर सोलापूरला रवाना होणार आहेत. आज ते पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची पूजा करणार आहेत. यावेळी चंद्रशेखर राव विठ्ठलावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number