कतरीना विकीचा फोटो व्हायरल

मुंबई, ९ जुलै २०२३, प्रतिनिधी : अभिनेत्री कतरिना कैफचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्यात ती समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असते. त्यामुळे तिच्या दैनंदिन जीवनातील गोष्टी जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांना फार रस आहे. कतरीना आणि अभिनेता विकी कौशल यांची जोडी देखील तितकीच लोकप्रिय आहे.दरम्यान नुकताच कतरिनाने तिचा पती विकी कौशलसोबत सकाळी कॉफी घेतानाचा फोटो समाज माध्यमांवर […]

कतरीना विकीचा फोटो व्हायरल

मुंबई, ९ जुलै २०२३, प्रतिनिधी : अभिनेत्री कतरिना कैफचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्यात ती समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असते. त्यामुळे तिच्या दैनंदिन जीवनातील गोष्टी जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांना फार रस आहे. कतरीना आणि अभिनेता विकी कौशल यांची जोडी देखील तितकीच लोकप्रिय आहे.दरम्यान नुकताच कतरिनाने तिचा पती विकी कौशलसोबत सकाळी कॉफी घेतानाचा फोटो समाज माध्यमांवर सामायिक केला आहे.

विकी आणि कतरिनाच्या फोटोसह कतरिनाने पॅनकेक्स आणि कॉफी मगचा फोटो देखील सामायिक केला आहे. फोटोमध्ये कतरिनाचा फक्त अर्धा चेहरा दिसत असून दोघेही एका हॉटेलमध्ये कॉफीचा आस्वाद घेताना दिसत आहेत.या फोटोंखाली कतरिनाने कॉफी मॉर्निंग्स…सर्वोत्तम! असे कॅप्शन दिले आहे.

हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल झाला असून. या फोटोखाली कतरिनाच्या चाहत्यांनी कंमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्याचवेळी, विकी कौशलनेही त्याचा मुंबईतील घरातील फोटो समाज माध्यमांवर सायीक केला. या फोटोमध्ये विकी-कतरिना एकमेकांचा हात धरताना दिसले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number