Raigad News: काशीद बीचवर थरारक बचावकार्य! बुडणाऱ्या दोन पर्यटकांना रोबोटिक वॉटर क्राफ्टने दिलं नवजीवन

काशीद समुद्रकिनाऱ्यावर बुडणाऱ्या दोन पर्यटकांचा रोबोटिक वॉटर क्राफ्टच्या मदतीने जीव वाचवण्यात आला.

Raigad News: काशीद बीचवर थरारक बचावकार्य! बुडणाऱ्या दोन पर्यटकांना रोबोटिक वॉटर क्राफ्टने दिलं नवजीवन

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध काशीद समुद्रकिनाऱ्यावर दोन पर्यटकांचा जीव थोडक्यात वाचला. समुद्रात बुडण्याच्या स्थितीत असलेल्या दोघांना रोबोटिक वॉटर क्राफ्टच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे, अशा प्रकारे आधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राज्यात प्रथमच दोन जणांचा जीव वाचवण्यात यश आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली येथील फुरकन शेख (वय 28) आणि कैफ शेख (वय 22) हे दोघे पर्यटनासाठी काशीद येथे आले होते. बुधवारी दुपारच्या सुमारास ते समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने काही वेळातच दोघेही खोल पाण्याकडे ओढले गेले आणि गटांगळ्या खाऊ लागले.

जीव धोक्यात आल्याचे लक्षात येताच त्यांनी मोठ्याने मदतीसाठी हाक मारली. त्यावेळी किनाऱ्यावर ड्युटीवर असलेले पोलीस हवालदार रोटकर आणि जीवरक्षक प्रथमेश लाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उपलब्ध करून दिलेल्या रोबोटिक वॉटर क्राफ्टचा वापर करत बचाव मोहीम सुरू केली.काही क्षणांतच हे उपकरण दोन्ही पर्यटकांपर्यंत पोहोचले. त्याच्या मदतीने दोघांनाही सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर नातेवाईकांच्या मदतीने त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच नागाव, काशीद आणि हरिहरेश्वर या किनाऱ्यांवर रिमोटवर चालणाऱ्या रोबोटिक वॉटर क्राफ्ट उपलब्ध करून दिल्या होत्या. 12 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या संकल्पनेतून या आधुनिक उपकरणांचे वितरण करण्यात आले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number