जय महाराष्ट्र न्यूज, कसारा
मुसळधार पावसामुळे जुना कसारा घाटात दरड कोसळल्याने 3 ते 4 वाहनांचे नुकसान झाले आहे.
दरड कोसळल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली.
सध्या वाहतूक पोलिस आणि कसारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरड बाजूला केली. यामुळे कसारा घाटात वाहतुकीचा खोळंबा झाला.