China Spy Drone: INS विक्रांत आणि कैगा अणुऊर्जा प्रकल्पाजवळ संशयास्पद हालचाल; चीनचा ‘स्पाय ड्रोन’ उडताना आढळला

कारवारचे सामरिक महत्त्व लक्षात घेता या प्रकरणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे भारतीय नौदलाचा प्रमुख तळ (Indian Navy Base) असून आयएनएस विक्रांत (INS Vikrant) याच ठिकाणी उभा केले जाते.

China Spy Drone: INS विक्रांत आणि कैगा अणुऊर्जा प्रकल्पाजवळ संशयास्पद हालचाल; चीनचा ‘स्पाय ड्रोन’ उडताना आढळला

कर्नाटकातील कारवार (Karwar) शहरात एका प्रवासी सीगल (Seagull) पक्ष्याच्या शरीरावर चिनी जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस (Chinese GPS Tracking Device) आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा पक्षी कारवारमधील थिम्मक्का गार्डन परिसराच्या मागील भागात दिसून आला. कारवार हे भारतासाठी अत्यंत सामरिक महत्त्वाचे ठिकाण असल्याने या घटनेची दखल सुरक्षा यंत्रणांनी गांभीर्याने घेतली आहे.
 
स्थानिक नागरिकांना सीगलच्या पाठीवर बांधलेले एक लहान इलेक्ट्रॉनिक उपकरण दिसून आले. हे उपकरण सामान्य नसल्याचा संशय आल्याने त्यांनी तातडीने वन विभागाला माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पक्ष्याला सुरक्षितपणे पकडून तपास सुरू केला. प्राथमिक पाहणीत ते उपकरण जीपीएस ट्रॅकर असल्याचे स्पष्ट झाले.

या ट्रॅकरवर इंग्रजी भाषेत Centre for Eco-Environment Science, Chinese Academy of Sciences असा उल्लेख आढळून आला. त्यामुळे हे उपकरण चीनमधील एका वैज्ञानिक संस्थेशी संबंधित असल्याचे समोर आले. सुरुवातीला हा विषय वैज्ञानिक संशोधनापुरता मर्यादित वाटत असला, तरी कारवारसारख्या संवेदनशील किनारी भागात असे उपकरण सापडल्याने सुरक्षा दृष्टिकोनातून चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: G Ram G Bill: लोकसभेत प्रचंड गदारोळात 'जी राम जी' विधेयक मंजूर; विरोधकांनी फाडल्या विधेयकाच्या प्रती

 
कारवारचे सामरिक महत्त्व लक्षात घेता या प्रकरणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे भारतीय नौदलाचा प्रमुख तळ (Indian Navy Base) असून आयएनएस विक्रांत (INS Vikrant) याच ठिकाणी उभा केले जाते. याशिवाय कैगा अणुऊर्जा प्रकल्प (Kaiga Nuclear Power Plant) देखील याच परिसरात आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका गृहीत धरून चौकशी केली जात आहे.
 
प्राथमिक माहितीनुसार, हा जीपीएस ट्रॅकर चिनी वैज्ञानिकांनी प्रवासी पक्ष्यांच्या स्थलांतर मार्ग (Migration Route), खाद्य सवयी आणि हालचालींचा अभ्यास करण्यासाठी बसवला असण्याची शक्यता आहे. जगभरात प्रवासी पक्ष्यांवर अशा प्रकारचे ट्रॅकर्स लावून संशोधन करणे ही एक सामान्य वैज्ञानिक पद्धत मानली जाते. मात्र, या प्रकरणात ठिकाण संवेदनशील असल्याने तपास अधिक काटेकोरपणे सुरू आहे.
 
सध्या संबंधित सीगलला मरीन फॉरेस्ट डिव्हिजन कार्यालयात ठेवण्यात आले असून पशुवैद्यकीय तज्ज्ञ त्याच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहेत. कारवार शहर पोलीस, नौदल पोलीस (Naval Police) आणि वन विभाग संयुक्तपणे तपास करत आहेत. तसेच, चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस (Chinese Academy of Sciences) शी संपर्क साधून हा प्रकल्प अधिकृत होता का, याची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या कोणताही ठोस सुरक्षा धोका आढळलेला नसला, तरी तपास पूर्ण होईपर्यंत यंत्रणा पूर्ण सतर्कतेत आहेत.

हेही वाचा: Mumbai Bandra Court Bomb Threat: वांद्रे आणि नागपूर न्यायालयांना बॉम्ब ने उडवण्याची धमकी; शोधकार्य सुरू

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number