कर्नाटकातल्या त्रिशंकू अवस्थेनंतर सत्ता स्थापनेची गणितं बदलली… सोनीया गांधीच्या फोननंतर आघाडीच्या प्रयत्नांन यश कुमारस्वामींना मुख्यमंत्री पदाच्या ऑफरसह जनता दलाला काँग्रेसचं समर्थन प्रस्ताव जनता दलाने स्विकारल्याची गुलामनबी आझाद यांची माहिती सत्ता स्थापनेसाठी भाजपाच्या गोटातही हालचालींना सुरुवात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर भाजपा अध्यक्ष अमित शहांच्या घरी दाखल येड्डीयूरप्पांनी मागीतली राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ,भाजपाही करमार सत्ता स्थापनेचा दावा राजकारणात […]
आता देशात कॉग्रेस शोधण्याचं अभियान सुरु करण्याची आवश्यकता…
केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांचे कौतुकोद्गार…
सीमा भागातील जनतेला नव्या सरकारने न्याय द्या उद्धव ठाकरेंची निकालांवर प्रतिक्रिया
ईव्हीएम बाबतचा संशयाचं भूत दूर करण्याचाही दिला सल्ला…
पालघर पोट निवडणूकीत बाजी मारण्याचा व्यक्त केला निर्धार…..
कर्नाटकच्या विजयाने भाजपचा आत्मविश्वास वाढला…2019 ला पुन्हा सत्तेत येणार…भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी व्यक्त केला विश्वास…
“अंगावर आलात तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही…मोदींवर टीका करून फक्त तुमचा खप वाढेल, आम्ही सामना तयार करायला तयार आहोत”…भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलारांनी शिवसेनेला डिवचलं…
कर्नाटकातील भाजपाचा विजय म्हणजे ईव्हीएम मशिनचा घोळ , कर्नाटक निवडणूक निकालावर राज ठाकरे यांची बोचरी प्रतिक्रिया…….
राहुल गांधी कॉग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून कॉग्रेसचा थेट तीसरा पराभव आहे. राहुल गांधी यांनी स्वत:ला पंतप्रधानाचे दावेदार घोषित केले होते. विरोधी पक्षांना एकत्र यायचे असेल तर, एकत्र यावे सर्व घाण एकत्र बाहेर काढू- केंद्रीय मंत्री राजवर्धन राठोड
कर्नाटकच्या गरीब लोकांचे नेतृत्व एडीयुरूप्पा करतील – आशिष शेलार
कॉंग्रेसने पुन्हा फोडलं ईव्हीएम मशीन्सवर खापर…भाजपकडून बॅलेटऐवजी ईव्हीएम मशीन्सचाच आग्रह का? कॉग्रेसचे जेष्ठ नेते मोहन प्रकाश यांचा सवाल
भाजपसाठी कर्नाटकचा विजय ऐतिहासीक म्हणत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी केलं कर्नाटकच्या जनतेचं अभिनंदन
कर्नाटकातील भाजपाचा विजय म्हणजे ईव्हीएम मशिनचा घोळ , कर्नाटक निवडणूक निकालावर राज ठाकरे यांची पहिला प्रतिक्रिया
कर्नाटकात भाजप सत्ता स्थापनेच्या दिशेने… कर्नाटकात विजयी झाल्यास 21 राज्यांवर NDAचा झेंडा…. बेंगळुरूमध्ये भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांचा जल्लोष.
कर्नाटकातली काँग्रेसची सत्ता गेली, शिकारीपुरामधून भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येड्डीयुरप्पा विजयी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा चामुंडेश्वरीमध्ये पराभव, तर बदामीमधून अल्प मतांनी आघाडी…
कर्नाटक मधील यशानंतर मुंबईतील भाजप कार्यालयात जल्लोष करण्यासाठी भाजप चे कार्यकर्ते आता जमत आहेत…थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि आशिष शेलार या जल्लोषात सहभागी होणार
कर्नाटक विधानसभा निवडणूक कलांचा शेअर बाजारावर परिणाम, सेन्सेक्स 310 अंकांनी उसळला
शिकारीपुरामधून भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येडियुरप्पा विजय, हालीवूर मतदारसंघातून काॅंग्रेसचे उमेदवार आर. व्ही देशपांडेचा विजय
काॅंग्रेसला धक्का …मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा चामुंडेश्वरीमध्ये पराभव, तर बदामीमधून अल्प मतांनी आघाडी
कर्नाटकातली काॅंग्रेसची सत्ता गेल्यात जमा, काॅंग्रेसचं संख्याबळ निम्म्याने घटण्याची चिन्हं, जनतादल सेक्युलरची किंगमेकरची भूमिका कागदावरच राहण्याची शक्यता
कर्नाटकात भाजप सत्ता स्थापनेच्या दिशेने….कर्नाटकात विजयी झाल्यास २१ राज्यांवर NDA चा झेंडा… बेंगळुरुमध्ये भाजपा कार्यालयात जल्लोष…
काँग्रेस आणि त्रिशंकूला मागे टाकत भाजपची एकहाती सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरु
चामुंडेश्वरी मतदारसंघातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या 11 हजार मतांनी पिछाडीवर
कर्नाटक निवडणुकीत काटे की टक्कर… काँग्रेस 91, भाजप 103 तर जेडीएस 27 जागांवर आघाडीवर…
काँग्रेसने गुलाम नबी आझाद आणि अशोक गहलोत वरिष्ठ नेत्यांना कर्नाटकात पाठवले… विधानसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर निर्णय…
बेळगावात चारही जागांवर एकीकरण समिती पिछाडीवर… कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या बदामी मतदारसंघातून आघाडीवर…
कर्नाटकात जेडीएसला मोठा धक्का… काँग्रेस आणि भाजपाच्या जागांमध्ये वाढ… तर जेडीएसला उतरती कळा…
कर्नाटकचा कल भाजपच्या बाजूने… काँग्रेस आणि भाजपात अटीतटीची लढत… त्रिशंकू विधानसभेची शक्यता जास्त…
आज समजणार कर्नाटकचा कौल
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांसाठी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. आर. आर. नगर मतदारसंघातील मतपत्रिकांचे घोटाळे आणि जयनगरमध्ये भाजप उमेदवाराच्या निधनामुळे या दोन जागांसाठी मतदान झाले नाही.