Road Accident: मठात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; चिमुकलीसह आठ जणांचा जागीच अंत

या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Road Accident: मठात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; चिमुकलीसह आठ जणांचा जागीच अंत

कर्नाटक-आंध्र प्रदेश सीमेवर झालेल्या भीषण रस्ता अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून किमान 12 जण जखमी झाले आहेत. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग 167 वर, धर्मपुथेर टोल प्लाझापासून सुमारे 8 ते 9 किलोमीटर अंतरावर, कुरनूल जिल्ह्यातील येम्मिगनूर उपविभागात घडला.

प्राथमिक माहितीनुसार, मंत्रालयम येथील प्राचीन श्री राघवेंद्र स्वामी मठात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या ट्रकची समोरून येणाऱ्या फ्लाय-ॲश टँकरशी जोरदार धडक झाली. या वाहनात एकूण 21 जण प्रवास करत होते. धडक इतकी भीषण होती की 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 5 महिला, 3 वर्षांची एक मुलगी आणि 2 पुरुषांचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह येम्मिगनूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा: Devendra Fadnavis: . '2029 मध्ये लोकसभेत दिसणार महिलांचे अभूतपूर्व वर्चस्व'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला महिला खासदारांच्या संख्येचा मोठा आकडा

प्राथमिक तपासात मृत आणि जखमी भाविक कर्नाटकातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील तारिके तालुक्यातील उदयी गावातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. त्यांनी मंत्रालयम यात्रेसाठी खासगी वाहन भाड्याने घेतल्याची माहितीही समोर आली आहे.

आंध्र प्रदेशचे मंत्री आणि स्थानिक आमदार टी. जी. भरत गुप्ता यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. यात्रेदरम्यान घडलेली ही दुर्घटना अत्यंत वेदनादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच अधिकाऱ्यांना जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. 

हेही वाचा: Ujjain Mahakal Temple: भस्म आरती ते शयन आरती… उज्जैनच्या महाकाल मंदिरात नवीन सशुल्क व्यवस्था लागू; भाविकांसाठी मंदिर प्रशासनाची नियमावली

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number