शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्रिमंडळाची आज बैठक, शिवसेना-भाजपात खडाजंगीची शक्यता

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शेतकरी संपावरुन राज्य पेटलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठकही वादळी ठरण्याची शक्यता आहे.   मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. एकीकडे विरोधक भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनंही शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवला.   त्यामुळे आजच्या बैठकीत शिवसेना आणि भाजप आमनेसामने […]

शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्रिमंडळाची आज बैठक, शिवसेना-भाजपात खडाजंगीची शक्यता

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकरी संपावरुन राज्य पेटलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठकही वादळी ठरण्याची शक्यता आहे.

 

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. एकीकडे विरोधक भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनंही शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवला.

 

त्यामुळे आजच्या बैठकीत शिवसेना आणि भाजप आमनेसामने उभे ठाकण्याची शक्यता आहे. शेतकरी कर्जमाफीवरून बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number