जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सरकारनं कर्जमाफी जाहीर केली, काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमाही झाली. मात्र, खात्यातून हे पैसे अचानक गायब झाले आणि शेतकरी आता पुन्हा कर्जबाजारी झालाय.
हे घडलंय, ते पंढरपूरचे शेतकरी देवानंद जगदाळेंसोबत. सरकारनं कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर देवानंद जगदाळेंच्या डोक्यावरचं कर्जाचा डोंगर कमी झाला. त्यांचं 64 हजार 401 रुपयांचं कर्ज माफ झालं.
मोबाईलमध्ये मेसेज आला, दादेगावच्या वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँकेतही त्यांनी खात्री केली आणि कर्जफेडीच्या चिंतेत बुडालेल्या त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
मात्र, हा आनंद काही दिवसांपुरताच टिकला, कारण त्यांच्या खात्यातील कर्जमाफीची रक्कम परत गेलीये आणि बँकांनी कर्जफेडीसाठी महिनाभराची मुदत दिलीये. त्यामुळे जगदाळे आता पुन्हा कर्जबाजारी झालेत.