कर्जमाफीसाठीच्या 15 पानी किचकट प्रक्रियेला शेतकऱ्यांचा विरोध; अर्जांची होळी करत नोंदवला निषेध

जय महाराष्ट्र न्यूज, उस्मानाबाद   सरकारने कर्जमाफीची घोषणा करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. परंतु, कर्जमाफीसाठी कराव्या लागणाऱ्या अर्जाची किचकट प्रक्रिया पाहून शेतकरी संतापले आहे. शेतकरी स्वाभीमानी संघटनेने कर्जमाफीच्या या अर्जांची होळी करत जाहीरपणे आपला निषेध नोंदवला आहे. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना 1,2 नव्हे तर तब्बल 15 पानांचा अर्ज भरावा लागणार आहे. ही प्रकिया अत्यंत त्रासदायक असल्याचे शेतकऱ्यांचे […]

कर्जमाफीसाठीच्या 15 पानी किचकट प्रक्रियेला शेतकऱ्यांचा विरोध; अर्जांची होळी करत नोंदवला निषेध

जय महाराष्ट्र न्यूज, उस्मानाबाद

 

सरकारने कर्जमाफीची घोषणा करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. परंतु, कर्जमाफीसाठी कराव्या लागणाऱ्या अर्जाची किचकट प्रक्रिया पाहून शेतकरी संतापले आहे.

शेतकरी स्वाभीमानी संघटनेने कर्जमाफीच्या या अर्जांची होळी करत जाहीरपणे आपला निषेध नोंदवला आहे.

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना 1,2 नव्हे तर तब्बल 15 पानांचा अर्ज भरावा लागणार आहे. ही प्रकिया अत्यंत त्रासदायक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या अर्जातील

अनेक मुद्दे शेतकऱ्यांना समजण्यापलीकडील असल्याचे शेतकरी स्वाभीमानी संघटनेचे म्हणणे आहे. सरकारनेच हा पंधरा पानी अर्ज भरून पहावा अशी मागणी यावेळी

शेतक-यांनी केली आहे.

या 15 पानी अर्जासह शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करुन मोबाईलवरुन एक ओटीपी द्यावा लागणार आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अद्याप मोबाईल नेटवर्कही

मिळत नाही. अशा परिस्थीतील हा ऑनलाईन नोंदणी करुन मोबाईलवर ओटीपी कसा मिळवणार असा प्रश्न देखील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

 

ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागणार आहे. यामुळे कर्जमाफीसाठी असलेली ही प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि त्रासदायक असल्याचे

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.   

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number