कर्जत तालुक्यातील माणगाव येथे भीषण आगीची घटना घडली आहे. माणगाव येथील राबिया गोट फार्मला आग लागून तब्बल 300 बकऱ्या जळून खाक झाल्या आहेत. ही आग रात्री सुमारे 1.30 वाजताच्या सुमारास लागली. माणगाव येथील राबिया गोट फार्ममध्ये अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण गोट फार्म आगीच्या विळख्यात सापडला. या आगीत सुमारे 300 बकऱ्या जळून खाक झाल्या असून फार्म मालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.