जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
दिग्दर्शक करण जोहरने स्टूडंट ऑफ द इयर2 चे पोस्टर शेअर केले आहे. करणने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. तसेच, 23 नोव्हेंबर 2018मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे करणने ट्विटमध्ये म्हटले आहे.
या पोस्टरमध्ये टायगर श्रॉफ डेनिम शर्टमध्ये दिसतोय. त्याने हातात बॅग घेतली आहे. त्याच्या मागे स्टूडंट ऑफ द इयर 2 असे लिह्ले आहे. मात्र, करणने अद्याप अभिनेत्रींचे नाव जाहिर केलेले नाही.
सिनेमातील अभिनेत्रींचे नाव पुढच्या महिन्यात घोषित करण्यात येणार आहे. असे देखील करणने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.