सिंधुदुर्गात एसटी महिला वाहकाचा चेकिंग ऑफिसरकडून विनयभंग

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग   सिंधुदुर्गात एसटी महिला वाहकाचा चेकिंग ऑफिसरकडून विनयभंग करण्यात आल्याची घटना घडलीय. फोंडा ते कणकवलीदरम्यान ड्युटी बजावणाऱ्या महिला वाहकाला एसटी ऑफिसरने विनयभंग केलाय. या चेकिंग ऑफिसरने एकांत साधत महिला वाहकाशी अश्लील संभाषण केले. महत्त्वाचं म्हणजे हा चेकिंग ऑफिसर ड्युटीवर नसतानाही बस स्थानकात आला होता. या घटनेनंतर पीडित महिला कर्मचाऱ्यानं चेकिंग ऑफिसर […]

सिंधुदुर्गात एसटी महिला वाहकाचा चेकिंग ऑफिसरकडून विनयभंग

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग

 

सिंधुदुर्गात एसटी महिला वाहकाचा चेकिंग ऑफिसरकडून विनयभंग करण्यात आल्याची घटना घडलीय. फोंडा ते कणकवलीदरम्यान ड्युटी बजावणाऱ्या महिला वाहकाला एसटी ऑफिसरने विनयभंग केलाय.

या चेकिंग ऑफिसरने एकांत साधत महिला वाहकाशी अश्लील संभाषण केले. महत्त्वाचं म्हणजे हा चेकिंग ऑफिसर ड्युटीवर नसतानाही बस स्थानकात आला होता.

या घटनेनंतर पीडित महिला कर्मचाऱ्यानं चेकिंग ऑफिसर शिवाजी राठोडवर कठोर कारवाई करण्यासाठी एसटी इंटक संघटनेने डीसी हसबनिस यांच्याकडे मागणी केली.

त्यानंतर डीसी हसबनिस यांनी राठोडच्या खात्यांतर्गत चौकशीचे आदेश दिलेत. तसंच पीडित महिलेनं पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदवलीय.

मात्र ,चेकिंग ऑफिसर शिवाजी राठोडची अटक टाळण्यासाठी कामगार एसटी संघटनेकडून प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आलाय.

दरम्यान अटकेच्या भीतीनं संबंधित ऑफिसरने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलाय.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number