मोठ्या हौसेने दसऱ्यासाठी फुलं आणायला गेलेल्या ‘त्या’ दोघी घरी परतल्याच नाहीत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   एल्फिस्टन रोड स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीत कांजूरमार्ग मधील दोन मैत्रिणींना आपला जीव गमवावा लागला आहे.   कंजूरमार्गच्या मिराशी नगरमध्ये रहाणाऱ्या शुभलता शेट्टी आणि नेहरू नगरमध्ये राहणाऱ्या सुजाता शेट्टी या दोघींची चांगली मैत्री होती.   दोघी मूळच्या कर्नाटकच्या असून लग्नानंतर आपल्या पतीसोबत कांजूरमार्गला रहात होत्या. सण असला की नेहमी या एकत्र दादर […]

मोठ्या हौसेने दसऱ्यासाठी फुलं आणायला गेलेल्या ‘त्या’ दोघी घरी परतल्याच नाहीत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एल्फिस्टन रोड स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीत कांजूरमार्ग मधील दोन मैत्रिणींना आपला जीव गमवावा लागला आहे.

 

कंजूरमार्गच्या मिराशी नगरमध्ये रहाणाऱ्या शुभलता शेट्टी आणि नेहरू नगरमध्ये राहणाऱ्या सुजाता शेट्टी या दोघींची चांगली मैत्री होती.

 

दोघी मूळच्या कर्नाटकच्या असून लग्नानंतर आपल्या पतीसोबत कांजूरमार्गला रहात होत्या. सण असला की नेहमी या एकत्र दादर फुल मार्केटला फुले आणायला जात असतं.

 

दसरा सणासाठी या दोघी नेहमीप्रमाणे एकत्र फुल आणायला परेलला आल्या होत्या. मात्र, चेंगराचेंगिरत या दोघी मैत्रिणींचा मृत्यू झाला.

 

दरम्यान या घटनेमुळे कांजूरमार्ग परिसरात शोककळा पसरली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number