अंगावर रोमांच उभे करणारा कंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा टीझर रीलिज!

ब्रिटिशांना आव्हान देणाऱ्या झांशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित मणिकर्णिका चित्रपट 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अभिनेत्री कंगना रणौत या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारत आहे. तिचा झाशीच्या राणीचा लूक याआधीच प्रेक्षकांनी पाहिलाय. तेव्हापासूनच चित्रपटाच्या टीझरबद्दल उत्सुकता होती. आता हा टीझर रीलिज झालाय आणि लोकांना तो खूप आवडल्याचं दिसत आहे. टीझरमध्ये खास करून कंगना राणौतने भूमिकेसाठी […]

अंगावर रोमांच उभे करणारा कंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा टीझर रीलिज!

ब्रिटिशांना आव्हान देणाऱ्या झांशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित मणिकर्णिका चित्रपट 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अभिनेत्री कंगना रणौत या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारत आहे. तिचा झाशीच्या राणीचा लूक याआधीच प्रेक्षकांनी पाहिलाय. तेव्हापासूनच चित्रपटाच्या टीझरबद्दल उत्सुकता होती. आता हा टीझर रीलिज झालाय आणि लोकांना तो खूप आवडल्याचं दिसत आहे.

टीझरमध्ये खास करून कंगना राणौतने भूमिकेसाठी केलेली मेहनत दिसून येतेय. तिच्या चेहऱ्यावरील भाव आणि युद्धकला यांचं विशेष कौतुक होतंय. मात्र याचबरोबर अनेकजण या चित्रपटाची तुलना बाहुबलीमधील देवसेना या व्यक्तिरेखेशी करत आहेत. तरीही हा टीझर ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटाच्या टीझरपेक्षा जास्त प्रभावी असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली आहे.  

या चित्रपटात कंगना राणौतसोबत अतुल कुलकर्णी, वैभव तत्ववादी, अंकिता लोखंडे इत्यादी कलाकार आहेत. चित्रपटाचं संगीत शंकर-एहसान-लॉय या त्रयीने केलं आहे. तर संवाद आणि गीतलेखन प्रसून जोशी यांनी केलं आहे.  

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number