कंगनाने ट्विटरवरून घेतली शाळा

बॉलीवूडची गॉसिप क्विन कंगना रानौत सोशल मीडियावर बेधडकपणे आपली मते मांडत असते. पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडियाच्या सहाय्याने तिने संताप व्यक्त केला आहे. आता कंगनाच्या नजरेला आयपीएलमधील काहीतरी खटकलं आहे तर तिनं त्यावरही प्रतिक्रिया देताना मागे पुढे पाहिलेलं नाही. अभिनेत्री कंगनाला नुकतंच रॉयल चॅलेंजर्स बेंगुळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या आयपीएल मॅच दरम्यान एक पोस्टर […]

कंगनाने ट्विटरवरून घेतली शाळा

बॉलीवूडची गॉसिप क्विन कंगना रानौत सोशल मीडियावर बेधडकपणे आपली मते मांडत असते. पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडियाच्या सहाय्याने तिने संताप व्यक्त केला आहे. आता कंगनाच्या नजरेला आयपीएलमधील काहीतरी खटकलं आहे तर तिनं त्यावरही प्रतिक्रिया देताना मागे पुढे पाहिलेलं नाही.

अभिनेत्री कंगनाला नुकतंच रॉयल चॅलेंजर्स बेंगुळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या आयपीएल मॅच दरम्यान एक पोस्टर दिसलाय. विशेष म्हणजे हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. त्यामुळे ती निराशा व्यक्त करत आहे.


यात पोस्टमध्ये ऑडिन्समध्ये एक मुलगा त्याच्या हातात एक प्लेकार्ड घेऊन उभा आहे. या प्लेकार्डमध्ये मुलानं विराट कोहलीला एक विनंती केलीय. ज्यात लिहिलंय,’हाय विराट अंकल, मी वमिकाला डेटवर घेऊन जाऊ शकतो का?’ . आता हीच गोष्ट कंगनाच्या नजरेत आली आणि तिला ती खटकली. तिनं ट्वीटरवर त्या प्लेकार्ड हातात पकडलेल्या मुलाच्या पालकांवर निशाणा साधला आहे. कंगना म्हणाली,”लहान मुलांना हे असं नको ते कशाला शिकवता. हे सगळं करून तुम्ही मॉर्डन किंवा कूल नाही तर अश्लील आणि फूल दिसता”.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number