आत्तापर्यंत सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोणची वर्णी लागत होती, पण आता दीपिकाचा हा मान मात्र तिच्यापासून हिरवण्यात आला आहे.
बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतने हा मान आपल्या नावावर केला आहे. कंगना ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटासाठी सर्वाधीक मानधन घेणारी बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे.
सर्वाधीक मानधन कुठली अभिनेत्री घेते याची स्पर्धा तर पुर्वीपासून सुरू आहे. काही काळापासून हा मान दीपिका पादुकोणच्या नावावर होता. तिने ‘पद्मावत’ या ऐतिहासिक चित्रपटासाठी अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन घेऊन सर्वाधीन मानधन घेणारी अभिनेत्री ठरली.
पण आता तिची जागा कंगना राणौतने घेतली आहे, कंगनाने ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटासाठी तब्बल 14 कोटी रुपये घेतले आहेत.
आत्तापर्यंत कुठल्याही अभिनेत्रीने एका चित्रपटासाठी इतकी फी घेतली नाही, कंगनाच्या मानधनाबद्दल विचारल्यावर ती म्हणाली, ‘माझी फी माझ्या भूमिकेवर अवलंबून असते.
प्रत्येक भूमिका वेगवेगळी असते आणि त्यानुसार त्याचं मानधन ठरते’. कंगनाचं ऊत्तर ऐकून हे नक्की निश्चित झालंय की, जेवढी कठीन भूमिका तेवढं जास्त मानधन.
आता ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचंच बोलायचं झालं तर यामध्ये कंगना झाशीची राणी लक्ष्मीबाईची व्यक्तिरेखा साकारते आहे आणि या आव्हानात्मक भूमिकेसाठी तसं पाहिलं तर 14 कोटी फार जास्त नाहीत असं म्हणावं लागेल.