एका लग्नातल्या चोराची गोष्ट !

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   एखाद्या लग्नात जाऊन सराईतपणे स्टेजवर असलेली आहेराची पाकिटं चोरणाऱ्या चोरट्याला कल्याण गुन्हे शाखा आणि खडकपाडा पोलिसांनी अटक केलीय. सद्दाम खान असं आरोपीचं नाव आहे. सद्दाम अबरार खान भिवंडीचा राहणारा आहे. डिसेंबर महिन्यात कल्याणच्या वाधवा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये प्रजापती कुटुंबीयांचा लग्नसोहळा सुरु होता. यावेळी वधू-वराला मिळालेल्या भेटवस्तू आणि आहेराची पाकिटं अज्ञात चोरट्याने […]

एका लग्नातल्या चोराची गोष्ट !

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एखाद्या लग्नात जाऊन सराईतपणे स्टेजवर असलेली आहेराची पाकिटं चोरणाऱ्या चोरट्याला कल्याण गुन्हे शाखा आणि खडकपाडा पोलिसांनी अटक केलीय. सद्दाम खान असं आरोपीचं नाव आहे. सद्दाम अबरार खान भिवंडीचा राहणारा आहे.

डिसेंबर महिन्यात कल्याणच्या वाधवा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये प्रजापती कुटुंबीयांचा लग्नसोहळा सुरु होता. यावेळी वधू-वराला मिळालेल्या भेटवस्तू आणि आहेराची पाकिटं अज्ञात चोरट्याने लांबवल्याचं समोर आलं होतं.

लग्नाच्या व्हिडीओ शूटिंगमध्येही स्टेजवर घुटमळताना हा चोरटा कैद झाला होता.

याप्रकरणी प्रजापती यांच्या तक्रारीनंतर खडकपाडा पोलिस आणि गुन्हे शाखेने कल्याण परिसरात घडलेल्या अशाच प्रकारच्या आणखी घटनांचे व्हिडीओ तपासले. त्यात एकच चोरटा सगळीकडे दिसून आल्याने त्याचा शोध घेऊन भिवंडीच्या कन्हेरीतून त्याला अटक करण्यात आलीय… सद्दाम खानने चोरीची कबुलीही दिलय. जवळपास दोन ते अडीच लाखांचा मुद्देमाल त्याने चोरल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number