जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
जागा पकडण्यासाठी महिला धावती ट्रेन पकडून जागा पकडतात. जागा न मिळाल्यास मुद्दाम भांडण करून महिलांची हुज्जद घालतात.
बुधवारी जागेसाठी कल्याण रेल्वे स्थनकात मुंबईकडे जाणाऱ्या एका लोकलमध्ये महिला प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून हाणामाराची घटना घडली.
कल्याणला जाणाऱ्या लोकलमध्ये डोंबिवलीमधून बसून डाऊन-अप जाण्यासाठी जागा आडवली. आधीच जागा अडवल्याचा राग आल्याने कल्याण स्थानकातील महिलांनी एका महिलेला मारहाण केल्याची घटना समोर आली.
मात्र, आज मुजोर महिलांवर जीआरपी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. तब्बल 15 ते 20 महिलांना ताब्यात घेण्यात आले. बऱ्याचदा लोकल ट्रेनमध्ये जागेवरुन वादावादी होते. अनेकदा प्रवासी आपल्या ग्रुपमधील लोकानांचा बसण्यास प्राधान्य देतात आणि त्यामुळे वाद होतात.
तसेच कल्याण आणि बदलापूरमध्ये अशा घटना सातत्यानं होत असल्याचं वारंवार निदर्शसनास आले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कल्याणहून अंबरनाथला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. चौथ्या सीटवर बसण्याच्या वादातून एका प्रवाशाचा तिघांशी वाद झाला होता. यावेळी त्याला ट्रेनमध्येच बेदम मारहाण करण्यात आली होती.