जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कल्याणच्या वाडेघर डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला भीषण आग लागली होती. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुमारे 10 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग अटोक्यात आल्याची माहिती मिळतेय.
खाडी किनाऱ्याच्या बाजूला असणाऱ्या कचऱ्याला आग लागली आणि ती वाऱ्यामुळे जोरात पसरत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी आणि नगरसेवक, भाजप गटनेते वरुण पाटील यांनी दिली. आग लागल्याचे समजताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्ळी दाखल झाल्या.
या आगीमुळे डम्पिंग ग्राऊंड शेजारील परिसरावर धुराचे मोठे लोट पसरले असून वाऱ्यामुळे हा धूर सर्वत्र पसरला होता.