Kalyan Crime: कल्याण हादरलं! 5 वर्षीय चिमुरडीवर 55 वर्षीय नराधमाकडून अत्याचार; ‘टोमॅटो देतो’ असं सांगून…

कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात 7 वर्षांच्या चिमुरडीवर 55 वर्षांच्या नराधमाकडून अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे

Kalyan Crime: कल्याण हादरलं! 5 वर्षीय चिमुरडीवर 55 वर्षीय नराधमाकडून अत्याचार; ‘टोमॅटो देतो’ असं सांगून…

कल्याण: कल्याण पूर्व भागातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 55 वर्षीय नराधमाने अवघ्या 7 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घृणास्पद प्रकारामुळे संपूर्ण कल्याण परिसरात तीव्र संतापाची लाट उषळली असून महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत नराधम आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: Mumbai Crime : प्रवाशाला चाकू भोसकणारा अखेर अटकेत, आरोपीची ओळख पटली; मुंबई पोलिसांची कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरातील रहिवासी असलेला जुमे अली शेख (वय 55) याने या निष्पाप चिमुरडीला टोमॅटो देण्याचे आमिष दाखवले. लहान असल्यामुळे चिमुरडी त्याच्या आमिषाला बळी पडली. आरोपीने तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या क्रूर कृत्यानंतर पीडित मुलगी जेव्हा कशीबशी आपल्या घरी परतली, तेव्हा तिने घडलेला सर्व धक्कादायक प्रकार आपल्या पालकांना सांगितला. मुलीची आपबिती ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली.

संतप्त आणि हवालदिल झालेल्या कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट कोळशेवाडी पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरुद्ध रीतसर तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून कोळशेवाडी पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी प्राथमिक तपास करून आरोपी जुमे अली शेख याला वेगाने चक्रे फिरवून बेड्या ठोकल्या. या प्रकरणात पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) कडक कलमे लावली असून पुढील तपास अत्यंत संवेदनशीलतेने केला जात आहे.

हेही वाचा: Ketan Agrawal Death Case: केतनला लोहगडावरून का ढकललं? सियाचा पोलिसांसमोर गुन्ह्याचा धक्कादायक खुलासा

या अमानुष घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच कल्याण पूर्व परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या घटनेचे तीव्र राजकीय पडसादही उमटताना दिसत आहेत. भाजप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), मनसे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांसारख्या विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने कोळशेवाडी पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले. त्यांनी या नराधमाला कठोरतम फाशीची शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अशा नराधमांना कोणत्याही प्रकारची कायदेशीर सवलत न देता, हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालवून पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, असा सूर सर्व स्तरातून उमटत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number