राज्यात पुन्हा एकदा मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सूरू असून कल्याणमध्ये सुरु असलेला भाजप विरुद्ध शिवसेना वाद भाजपा आमदार गणेश नाईकांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा विरोध कायम राहिल्यास शिंदे यांना ठाण्याचा पर्याय खुला असेल. अश्यावेळी ठाण्यात भाजपचा पाठिंबा मिळवण्यासाठी ठाण्यातील मातब्बर नेते आमदार गणेश नाईक यांना मंत्री मंडळात स्थान देऊन श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.