जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण
तिसाई मंदिरात प्रवेश करण्यासाठी महिलांनी गाऊन घालुन जाऊ नये असा नियम मंदिर प्रशासनाने केला आहे. याचं नियमाचं उल्लघंन करीत गाऊन घालुन तिसाई मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिला पोलिस अधिकारी पीएसआय प्रतिक्षा लाकडे यांना आशा अनंता गायकवाड या महिलेने जाब विचारला असता या महिला पोलिस अधिकाऱ्याने आशा गायकवाड यांना लाथाबक्क्यांनी जबर मारहाण केलीय.
या मारहाणीत आशा गायकवाड जबर जखमी झाल्या आहेत. या गंभीर प्रकाराची तक्रार देण्यासाठी आशा गायकवाड या कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गेल्या असता त्यांना उडवा-उडवीची उत्तरं देण्यात आली, मात्र प्रसारमाध्यमामध्ये ही बातमी आल्यानंतर एन सी दाखल करून घेण्यात आली आहे.