स्वदेशी बनावटीची कलवारी पाणबुडी भारतीय नौदलाकडे सुपूर्द

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   स्वदेशी बनावटीची कलवारी पाणबुडी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. माझगाव गोदीत बांधण्यात आलेली स्वदेशी बनावटीची पहिली स्कॉर्पियन पाणबुडी आहे.   माझगाव गोदीनं फ्रान्सच्या डीसीएनएस कंपनीच्या सहकार्यानं 6 पाणबुड्या निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यापैकी पहिल्या पाणबुडीची निर्मिती माझगाव गोदीनं केली.   भारताकडील सिंधुघोष आणि शिशुकुमार पाणबुड्या आता 30 वर्षं जुन्या झाल्यात. […]

स्वदेशी बनावटीची कलवारी पाणबुडी भारतीय नौदलाकडे सुपूर्द

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

स्वदेशी बनावटीची कलवारी पाणबुडी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. माझगाव गोदीत बांधण्यात आलेली स्वदेशी बनावटीची पहिली स्कॉर्पियन पाणबुडी आहे.

 

माझगाव गोदीनं फ्रान्सच्या डीसीएनएस कंपनीच्या सहकार्यानं 6 पाणबुड्या निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यापैकी पहिल्या पाणबुडीची निर्मिती माझगाव गोदीनं केली.

 

भारताकडील सिंधुघोष आणि शिशुकुमार पाणबुड्या आता 30 वर्षं जुन्या झाल्यात. त्यामुळे ही नवीन पाणबुडी जुन्या पाणबुड्यांची जागा घेणार आहे.

 

चीनची वाढती ताकद पाहता भारत आता आपल्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी धडपड करतोय.

स्कॉर्पिअन पाणबुडी आयएनएस कलवारीची वैशिष्ट्यं 

 

– अरबी समुद्रात टेस्टींग दरम्यान ‘कलवारी’तून अँटीशिप मिसाईलने समुद्राच्या खोलातील सर्वच टारगेटला हिट केलं होतं. या मिसाईलमध्ये समुद्रातील दुश्मनांच्या वॉरशिप संपवण्याची क्षमता आहे.

– कलवारी हे नाव एकप्रकारच्या शार्क माशावरून घेतले आहे.

– या माशाला टायगर शार्क म्हणतात

– कलवारी डिझल आणि इलेक्ट्रिक सबमरीन आहे

– ‘कलवारी’ तील गायडेड शस्त्रास्त्र दुश्मनांच्या चिंधड्या उडवू शकतात

– ‘कलवारी’ टॉरपीडो हल्ल्यांसोबतच पाण्याच्या आतही हल्ले करता येऊ शकतात. त्यासोबतच पाण्यातून जमिनीवरही यातून हल्ला केला जाऊ शकतो.

– या पाणबुडीचं डिझाईन असं करण्यात आलंय की, ही पाणबुडी कोणत्याही प्रकारच्या युद्धात ऑपरेट केली जाऊ शकते.

– दुस-या नेव्हल टास्क फोर्ससोबत सहजतेने संवाद साधण्यासाठी यात खास कम्युनिकेशन मिडीयम देण्यात आलं आहे.

– ही पाणबुडी प्रत्येक प्रकारचे वॉरफेअर, अँटी-सबरमरीन वॉरफेअर आणि इंटेलिजंसला एकत्र करण्याचं काम उत्तम करू शकते.

– ‘कलवारी’ मध्ये वेपन्स लॉन्चिंग ट्यूब्स देण्यात आले आहेत. यामुळे समुद्रात यावर शस्त्रास्त्र लोड केले जाऊ शकतात आणि कोणत्याही क्षणी हल्ला केला जाऊ शकतो.

– ही नवीन स्कॉर्पीन पाणबुडी जुन्या पाणबुड्यांची जागा घेणार आहे. भारताकडील सिंधुघोष आणि शिशुकुमार पाणबुड्या आता ३० वर्ष जुन्या झाल्या आहेत. चीनची वाढती ताकद पाहता भारत आता आपल्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी धडपड करत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number