२५ जुलै, २०२४ पनवेल : पनवेल तालुक्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे पनवेल शहरातील काळुंद्रे नदीला पूर आला आहे. भिंगारी – नांदगाव मार्गावर काळुंद्रे नदीवरील पुलावर पुराच्या पाण्यात एक चारचाकी अडकल्याची घटना घडली. या पुलावरून वाहनचालक नियमित प्रवास करतो. मात्र, गुरुवारी सकाळी पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पुलाच्या मधोमध ही चारचाकी अडकली. सुदैवाने चालकाने चारचाकीतून बाहेर पडून आपला जीव वाचवला. दरम्यान, भींगारी गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चारचाकी बाहेर काढली.