हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फडला अटक; दमानियांच्या ट्वीटनंतर कारवाई

हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फडला अटक करण्यात आली आहे.

हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फडला अटक; दमानियांच्या ट्वीटनंतर कारवाई

बीड : हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फडला अटक करण्यात आली आहे. परळी शहर पोलिसांनी फडच्या मुसक्या आवळल्या आहेत. परळी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अंजली दमानिया यांच्या ट्विटनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

अंजली यांच्या ट्विटची दखल घेत कैलास फडला अटक करण्यात आली आहे. फड याने हवेत गोळीबार केल्याने अटक करण्यात आली आहे. अंजली यांनी आणखी एका ट्विट पोस्टच्या माध्यमातून शस्त्र परवान्यावर भाष्य केले आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या शास्त्र परवान्यांची  ताबडतोब चौकशी लावा. जिथे गरज नाही असे सगळे शास्त्र परवाने रद्द करा. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे गुंडांचा नाही असे ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणीसांना आवाहन केले आहे.

 

'बीडमध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही'

अंजली दमानिया यांनी हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फड याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यानंतर कैलास फड याला अटक करण्यात आली. या अटकेनंतर बीडमध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number