जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भायखळा जेलमधील कैदी मंजुळा शेट्येच्या मृत्यूनंतर जेलच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाल्याचं मत मुंबई हायकोर्टानं नोंदवलं आहे.
सध्या जेलच्या परिस्थितीबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने हे मत नोंदवले.
राज्यभरातील जेलमध्ये कैद्यांना मिळणा-या सोयीसुविधांबद्दल हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
राज्यभरातील जेलमध्ये कैद्यांच्या संख्येच्या तुलनेत जागा अपूरी पडत असल्याचा मुद्दाही याचिकांमध्ये मांडण्यात आला आहे.
भायखळा जेलमध्ये मंजुळा शेट्ये यांच्या मृत्यूनंतर, जेलमधील पोलीस अधिकाऱ्यांनी शेट्येंचा खून केल्याचा आरोप जेलमधील इतर सहकारी कैद्यांनी केला होता.