‘कदमांच्या मुलाला हरवणारच’

गुहागर मतदाररसंघातील उद्धव गटाचे नेते भास्कर जाधव यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला रोखठोक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत भास्कर जाधव यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांवर घणाघात केला आहे. “भास्कर जाधव आपल्या आईवर उलटले, असे वक्तव्य करून रामदास कदम यांनी १८ वर्षांपूर्वी मला जखम दिली होती.” “पण, ज्या शिवसेनेला रामदास कदम आई मानायचे त्याच शिवसेनेवर आपल्या […]

‘कदमांच्या मुलाला हरवणारच’

गुहागर मतदाररसंघातील उद्धव गटाचे नेते भास्कर जाधव यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला रोखठोक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत भास्कर जाधव यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांवर घणाघात केला आहे.

“भास्कर जाधव आपल्या आईवर उलटले, असे वक्तव्य करून रामदास कदम यांनी १८ वर्षांपूर्वी मला जखम दिली होती.” “पण, ज्या शिवसेनेला रामदास कदम आई मानायचे त्याच शिवसेनेवर आपल्या मुलासह रामदास कदम आता उलटले आहेत”, असेही वक्तव्य भास्कर जाधव यांनी मुलाखतीत केले.

“रामदास कदमांच्या मुलाला मी पराभूत करणार म्हणजे करणारच”, असे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केले आहे. “भास्कर जाधवाने रामदास कदमांना पराभूत केले आहे तर त्यांच्या मुलालाही मी पराभूत करेन”, असे भास्कर जाधव मुलाखतीत म्हणाले.

यावर, शिवसेना नेते रामदास कदम यांनी हे वक्तव्य हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. “इतक्या वर्षांपासून एवढं सर्व मनात ठेवलं म्हणजे तू किती कपटी असशील ?” “तूच काय उद्धव ठाकरे जरी समोर उभे राहिले तरी योगेश कदम पडू शकत नाही”, असे उत्तर रामदास कदम यांनी दिले आहे. “अजून दोन वर्ष बाकी आहेत त्यात मी तुला नक्की गाडेन”, असेही वक्तव्य रामदास कदम यांनी केले आहे.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number