देश-विदेशातील पर्यटांचे आकर्षण असलेल्या साताऱ्यातील कास पठारावर अज्ञातांनी लावली आग

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा   जैववैविध्याने नटलेले सातारा जिल्ह्य़ातले कास पठार हे सह्य़ाद्रीतील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणून ओळखलं जातं. गेल्या काही वर्षांत हे पठार पर्यटनाच्या नकाशावर हॉट स्पॉट ठरलंय. साधारण दहा-पंधरा वर्षांपूर्वी कासला आजच्यासारखी गर्दी अजिबात नव्हती. कासचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्यानंतर कासकडे पर्यटकांचा ओघ आणखीनच वाढला. कास पठाराच्या काही भागात अज्ञात लोकांनी वणवा […]

देश-विदेशातील पर्यटांचे आकर्षण असलेल्या साताऱ्यातील कास पठारावर अज्ञातांनी लावली आग

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

जैववैविध्याने नटलेले सातारा जिल्ह्य़ातले कास पठार हे सह्य़ाद्रीतील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणून ओळखलं जातं. गेल्या काही वर्षांत हे पठार पर्यटनाच्या नकाशावर हॉट स्पॉट ठरलंय.

साधारण दहा-पंधरा वर्षांपूर्वी कासला आजच्यासारखी गर्दी अजिबात नव्हती. कासचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्यानंतर कासकडे पर्यटकांचा ओघ आणखीनच वाढला. कास पठाराच्या काही भागात अज्ञात लोकांनी वणवा लावल्याने या ठिकाणचे गवत आणि वाळलेल्या वनस्पती जळून गेल्या आहेत .नेमकी आग कोणी लावली आहे या बाबत अद्याप वनविभागाला समजले नसले तरी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1850 हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या या विस्तीर्ण पठारावर ज्या भागात वणवा लावण्यात आला होता.

सुदैवाने रस्त्यालगतच्या भागात लावण्यात आलेली ही आग जास्त न पसरल्यानं मुख्य पठार सुरक्षित राहिले. त्याला कोणताही धोका नसल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number