Homeमहाराष्ट्र ‘न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू हृदयविकारानेच’; पोलीस आयुक्तांची माहिती
‘न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू हृदयविकारानेच’; पोलीस आयुक्तांची माहिती
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र सरकारकडून सुप्रीम कोर्टात लिफाफाबंद कागदपत्र सादर केली आहेत. गोपनीय अहवाल सादर झाल्यानंतर यासंदर्भातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार लोया यांचा मृत्यू हा हृदयविकारानेच झाला असल्याचे नागपूर पोलिसांच्या तपासात सिद्ध झाले. त्यामुळे या प्रकरणात तपास करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे नागपूरचे सह पोलिस […]
न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र सरकारकडून सुप्रीम कोर्टात लिफाफाबंद कागदपत्र सादर केली आहेत. गोपनीय अहवाल सादर झाल्यानंतर यासंदर्भातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
दरम्यान, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार लोया यांचा मृत्यू हा हृदयविकारानेच झाला असल्याचे नागपूर पोलिसांच्या तपासात सिद्ध झाले. त्यामुळे या प्रकरणात तपास करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे नागपूरचे सह पोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी सांगितले.