‘जुरासिक वर्ल्डः फॉलन किंगडम’ चा थरारक ट्रेलर रसिकांच्या भेटीला

वृत्तसंस्था, मुंबई चित्रपटातून भेटीला आलेलं ‘डायनासोर’च्या भव्यदिव्य आणि रूद्र रूपाने जगभरातील प्रेक्षकांना चांगलीच भूरऴ घातलीय. डायनासॉरचे रूप थरकाप भरवणारे आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला होता.  या सीरिजमधील आणखी एक सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. जे.ए. बेयोना यांनी दिग्दर्शित केलेला ‘जुरासिक वर्ल्ड: फॉलन किंगडम’ हा चित्रपट लवकरच प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा […]

‘जुरासिक वर्ल्डः फॉलन किंगडम’ चा थरारक ट्रेलर रसिकांच्या भेटीला

वृत्तसंस्था, मुंबई

चित्रपटातून भेटीला आलेलं ‘डायनासोर’च्या भव्यदिव्य आणि रूद्र रूपाने जगभरातील प्रेक्षकांना चांगलीच भूरऴ घातलीय. डायनासॉरचे रूप थरकाप भरवणारे आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला होता.  या सीरिजमधील आणखी एक सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. जे.ए. बेयोना यांनी दिग्दर्शित केलेला ‘जुरासिक वर्ल्ड: फॉलन किंगडम’ हा चित्रपट लवकरच प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. मनुष्य आणि प्राण्यांमधील संघर्ष प्रेक्षकांचा थरकाप उडवणारा आहे. डायनासॉरला मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी या चित्रपटाचे निर्माते स्टीवन स्पिलबर्ग यांनी खूप मेहनत घेतली आहे. हा चित्रपट भारतात अमेरिकेच्या आधी दोन आठवडे प्रदर्शित करण्यात येणार आहे.  अमेरिकेत 22 जून तर भारतामध्ये हा चित्रपट 8 जून रोजी प्रदर्शित करण्यात येईल.

  ‘जुरासिक वर्ल्ड: फॉलन किंगडम’ हा चित्रपट ज्युरासिक सीरिजमधील पाचवा चित्रपट आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण इंग्लंड आणि हवाईमध्ये करण्यात आले आहे.  या चित्रपटामध्ये अभिनेता क्रिस पॅट प्रमुख भूमिकेत आहे. तसेच, जेफ गोल्डब्लम,  ब्राइस डलास हॉवर्ड, क्रिस पॅट आणि इयान मॅलकमही झळकणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता इरफान खानदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number