ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांचे निधन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई पत्रकारिता आणि साहित्याच्या क्षेत्रांत स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहचवणारे अरुण साधू यांचे निधन झाले आहे. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.   ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून साधू यांची प्रकृती […]

ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांचे निधन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पत्रकारिता आणि साहित्याच्या क्षेत्रांत स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहचवणारे अरुण साधू यांचे निधन झाले आहे. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून साधू यांची प्रकृती खालावली होती. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना रविवारी सकाळी मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या देहदानाच्या निर्णयामुळे त्यानुसार पुढील सोपस्कार पार पाडले जाणार आहेत. साधू यांच्या निधनामुळे पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

अरुण साधू यांनी केसरी, माणूस, इंडियन एक्स्प्रेस अशी विविध वृत्तपत्रे व साप्ताहिकांतून पत्रकारिता केली होती. सहा वर्षे ते पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख होते. ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मानही त्यांना मिळाला होता. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान व अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

 

अरूण साधू यांचा जन्म 1942 साली झाला. ते मराठी भाषेतील लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक होते. त्यांनी रशियातील तसेच भारतातील सामाजिक व्यवस्थांवर विवेचक लेखन केले आहे.  त्यांनी कादंबऱ्या, कथासंग्रह, नाटके, ललित लेखन, समकालीन इतिहासाचे लेखन केले आहे. त्याचबरोबर हिंदी आणि इंग्रजीत लेखन करून त्यांनी एकांकिकाही केल्या आहेत. सुनी तारापोरवाला आणि दया पवार बरोबर साधु डॉ बाबासाहेब आंबेडकर चित्रपटाचे सह-पटकथा लेखक होते.

अरुण साधू यांची साहित्यसंपदा

झिपर्‍या, तडजोड, त्रिशंकू, बहिष्कृत, मुखवटा, मुंबई दिनांक, विप्लवा, शापित, शुभमंगल, शोधयात्रा, सिंहासन, स्फोट यासारख्या कांदबऱ्याचे लेखन त्यांनी केले आहे.

एक माणूस उडतो त्याची गोष्ट, कथा युगभानाची, ग्लानिर्भवति भारत, बिनपावसाचा दिवस, बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणार्‍या इमारती, मंत्रजागर, मुक्ती त्याचे हे कथासंग्रह प्रसिध्द झाले. 

अक्षांश-रेखांश, तिसरी क्रांती, सभापर्व, सहकारधुरीण (चरित्र) इत्यादी ललित लेखन त्यांनी केले आहे. आणि ड्रॅगन जागा झाला, जेव्हा ड्रॅगन जागा होतो, फिडेल, चे आणि क्रांती, तिसरी क्रांती या कादंबऱ्याही प्रसिध्द आहेत. 

 

प्रारंभ, बसस्टॉप या एकांकिका तसेच पडघम नाटक इत्यादी मधून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. The Pioneer (चरित्र) हे इंग्रजी संपादनही त्यांनी केले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number